संगणकावर मराठी टायपिंग कसे करावे ? Best Marathi Typing Softwares for Windows
संगणकावर मराठी टायपिंग करण्यासाठी काय करावे ?
संगणकावर प्रादेशिक भाषांसाठी कोणता फॉन्ट वापरला जातो ? , Marathi typing font, Marathi typing software, Marathi typing keyword Devanagari, English to marathi typing software
सध्या विंडीज operating system असलेल्या computer मध्ये काहीवेळा मराठी typing करण्याकरिता inlut tools दिलेली नसतात, असली तरी ती सोप्पी नसतात त्यामुळे ह्या लेखात आपण कश्याप्रकारे मराठी टायपिंग करू शकतो ही माहिती देत आहोत. Marathi to english typing, english tyling tools
Microsoft indic input tool
Microsoft चे इंडिक इनपुट टूल हा बेस्ट पर्याय आहे. हे इंग्लिश to मराठी करिता ज्याप्रमाणे आपण google input वापरतो, त्याच प्रकारे हे सुद्धा वापरता येते.
जर एखादे कठीण जोडाक्षर आले तर आपण Microsoft accessories मधील कॅरॅक्टर मॅप वापरून कठीण जोडाक्षर तयार करू शकतो. मात्र याची जास्त गरज पडत नाही, कारण आपण जर बरोबर स्पेलिंग type केले तर, जे हवे ते जोडाक्षरे मिळून जातात.
दिवसेंदिवस हे सॉफ्टवेअर update होत असून यामध्ये नवनवीन function येत आहेत, त्यामुळे हे वापर करण्यास खूप सोपे जात आहे, आपल्याला समजणार पण नाही की आपण गुगल इनपुट वापरत आहोत की, इंडिक keyboard.
त्यात ते खास मायक्रोसॉफ्ट कंपनीचे असल्याने वापर करण्यास खूप मस्त आहे, तर आपण याचा नक्की विचार करू शकता.
Microsoft marathi indic tool link खाली देत आहे, यावर जाऊन तुम्ही हे मायक्रोसॉफ्ट मराठी इंडिक टूल download करू शकता.
Link –
https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx
CDAC ISM
पुण्याच्या सीडॅक – C DAC संस्थेने हे ISM हे typing सॉफ्टवेअर विकसित केले आहे. कोणत्याही भारतीय भाषेत indian language मध्ये हे वापरता येते, हे याचे वैशिष्ट्य आहे.
सीडॅक ह्या सरकारी तंत्रज्ञान विषयवार आधारित संस्थेने बऱ्याच टायपिंग सॉफ्टवेअरचा अभ्यास करून हे ism सॉफ्टवेअर तयार केले आहे.
CDAC ISM TYPING KEYBOARD चे वैशिष्ट्य म्हणजे यावर आपण कृतीदेव टायपिंग करू शकतो ! कृतीदेव टायपिंग म्हणजे तेच जे आपण typewriter वर टायपिंग करताना वापर करतो.
तसेच आपण सोबत फॉनेटिक्स, बायलिंगवल यांचा सुद्धा सहजरित्या वापर करू शकतो.
CDAC ISM TYPING KEYBOARD चे अधिकृत डाऊनलोड लिंक :
https://www.cdac.in/index.aspx?id=ev_corp_gist_ism_launch
Google inlut tool – गुगल इनपुट टूल
हे आहे सर्वांचे आवडते गुगल इनपुट टूल, याचा वापर आपण ज्याप्रमाणे मोबाईल टायपिंग करताना करतो, त्याचप्रकारे संगणकावर करायचा आहे.
मध्यंतरी हे सॉफ्टवेअर संगणकावर सुरू होण्यास भरपूर समस्या येत होत्या, आता हे पाहावे लागेल की हे तुमच्या windows operating system ला कितपत सपोर्ट करत ते.
खालील link वर google crome करिता google input tool extension चा वापर करून सुद्धा हे टूल वापरू शकता.
https://www.google.com/inputtools/chrome/
सौजन्य – www.hitechmarathi.com
إرسال تعليق