तालिबान काय आहे | Taliban in marathi

taliban information in marathi, taliban news in marathi, taliban wiki in marathi taliban meaning in marathi अफगाणिस्तानचा इतिहास, अफगाणिस्तान तालिबान, तालिबानचा नकाशा, who is taliban

Taliban in marathi तालिबान काय आहे
Taliban news marathi – तालीबान म्हणजे काय

Taliban news in Marathi

सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबानमुळे खूप भयावह वातावरण तयार झाले आहे, त्यात फक्त अफगाणिस्तान नाहीतर पूर्ण जगाचे लक्ष ह्या देशाकडे लागून आहे, कारण तालिबान काय आहे. हे सर्व जगाला माहिती आहे. तालिबान पासून सर्व जगाला धोका आहे. तर सध्या तालिबान काय आहे | तालिबान म्हणजे काय | हे ह्या लेखात जाणून घेऊया.

Taliban meaning in marathi – पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधल जात.

सोव्हिएत संघाने स्वतःचे सैन्य 90 च्या दशकात अफगाण मधून मायदेशी बोलवले, त्याच काळात अफगाणिस्तान मध्ये तालिबानी संघटना उदयास आली. पश्तो मध्ये तालिबान म्हणजे विद्यार्थी असा अर्थ होतो. मदरसांमधून ह्या पश्तो आंदोलनाची सुरुवात झाली, या मदरसांमधून सुन्नी इस्लामचा धार्मिकपणा, कट्टरवाद याचा प्रसार सुरू झाला. याला खतपाणी म्हणून सौदी अरेबियाने पैसा पुरवला. त्याच काळात अफगाणिस्तान मधील दक्षिण भागात व पश्चिम भागात हे तालिबानी जोर धरू लागले, त्यांचा प्रभाव वाढीला लागला. हे कमी की काय तर सप्टेंबर महिन्यात 1995 ला, तालिबानीनी इराणच्या जवळच्या हेरात प्रांत ताब्यात घेतला. लगेचच वर्ष भरात ह्याच तालिबानने काबुल जी अफगाणिस्तानची राजदधानी आहे तिला ताब्यात घेतले.

taliban information in marathi

सोव्हिएत सैन्याना विरोध करणाऱ्या मुजाहिदीन संघटनेच्या बुऱ्हानुदिन रब्बानीकडे अफगाणिस्तानची सत्ता होती. तालिबानने बुऱ्हानुदिन रब्बानी याची सत्ता काढून टाकली व 1998 च्या आसपास कमीत कमी 90 टक्क्यांपेक्षा जास्त अफगाणिस्तान मिळवले. सुरुवातीच्या कालखंडात तेथील नागरिकांनी तालिबानचे स्वागत केले, कारण अफगाणिस्तान मधील नागरिक मुजाहिद्दीन च्या अंर्तगत वादास वैतागले होते, त्यात तालिबानने अफगाणिस्तान मधील भ्रष्टाचार कमी केला, शिक्षा देण्यासाठी स्वतः इस्लामिक धर्मात लिहिलेले कायदे चालू केले खून कारण्याऱ्यास सार्वजनिक ठिकाणी फाशी देत, चोरी करण्याऱ्याचे अवयव कापत वगैरे, तसेच सुधारणा म्हणून रस्ते बांधले, नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून त्यांचे मन जिंकले. पण त्यांना त्यावेळी माहिती नव्हते पण पुढे तालिबान काय आहे हे समजले असेल.

 

Taliban map
Taliban map

 

त्यात स्वतःचे कायदे निर्माण केले इस्लामिक पद्धतीचे पुरुषांना दाढी ठेवणे व महिलांना बुरखा सक्तीचा केला. वय वर्षे 10 च्या पुढील मुलींच्या शाळा बंद केल्या. टीव्ही वर बंदी घातली. तालिबानला आंतराष्ट्रीय स्तरावर भरपूर प्रमाणात विरोध झाला, तरी पाकिस्तानने त्यांची बाजू घेतली त्यात सौदी अरेबिया व संयुक्त अरब हे सुद्धा तालिबानीच्या पाठीशी होते. त्यात तालिबान बद्दल लिखाण करण्याऱ्या मलाला युसफजई हिच्यावर गोळीबार करून तिला जखमी केले होते.

taliban wiki in marathi

11/07/2001 मध्ये वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील हल्ला यामुळे तर सर्व जगाचे लक्ष ह्या तालिबानवर गेले. कारण ह्या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला लादेन याला मदत केल्याची व शरण दिल्याचा तालिबानवर ठपका होता. 2013 मध्ये तालिबानचा म्होरक्या असणाऱ्या हकीमुल्ला मेहसूद व त्याचे इतर 3 साथीदार यांच्यावर पाकिस्तान मधील तालिबानी केंद्रावर ड्रोन हल्ला करून अमेरिकेने यांना गार केले.

7/10/2001 रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. 12/2001 च्या पहिल्याच आठवड्यात तालिबानच शासन नष्ट झाले. पाकिस्तान मधील क्वेटा येथे तालिबानी नेत्यांनी आश्रय घेतला मात्र पाकिस्तान ने हे कधी कबूल केले नाही. त्यांनतर सुद्धा असे छोटे मोठे हल्ले सुरूच होते, अफगाणिस्तान मधील नागरिक हैराण झाले होते, फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला.

शेवटी तालिबान काय आहे ? त्यांनी पत्रकार, महिला यांना त्रास देने सोडले नाही. त्यांनी त्यांची विचारसरणी अजूनही तशीच सुरू ठेवली आहे. अफगाणीस्थानचे  सत्ताधारी यांचे मत आहे की, ते आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय काहीच करू शकत नाही, त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी एप्रिल 2021 मध्ये अमेरिकेन सैन्य परत बोलावत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, 11 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैनिक अफगाणिस्थान मधून परत बोलावण्यात आले.

तर सध्या काय परिस्थिती सुरू आहे आपण पाहतच आहोत., Taliban in marathi,तालिबान काय आहे ,taliban information in marathi, taliban news in marathi, taliban wiki in marathi taliban meaning in marathi अफगाणिस्तानचा इतिहास, अफगाणिस्तान तालिबान, तालिबानचा नकाशा, who is taliban.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने