आताच डाउनलोड करा

राम राम मंडळी स्वस्तात मस्त आरोग्यवर्धक फळ कोणते असेल तर ते आहे पेरू होय. ह्या लेखात आपण पाहणार आहोत पेरू खाण्याचे फायदे. क जीवनसत्त्वे असलेल्या पेरू चे फायदे बद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया ह्या नवीन लेखात पेरू फळाची माहिती मराठी मध्ये.

 

पेरू खाण्याचे औषधी फायदे – peru khanyache fayde
पेरू खाण्याचे फायदे | peru khanyache fayde

पेरू खाण्याचे फायदे | peru khanyache fayde

फक्त बदामच खाऊन नाही तर पेरू खाल्याने देखील बुद्धी वाढते, होय पेरू हा बुद्धिवर्धक आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना बुद्धीचा वापर करून करावयाची कामे जास्त असतात, कामाचा जास्त ताण असतो त्यांचा मानसिक ताण कमी करण्याचे काम हा पेरू करतो. पेरू चा फायदा म्हणजे हा मेंदूमध्ये ऊर्जा निर्मिती सुद्धा करतो.

पोर्तुगीज हे जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी सोबत दक्षिण अमेरिका येथून पेरू सुद्धा घेऊन आले असे म्हणावे लागेल, कारण भारतात पेरू आणण्याचे श्रेय पोर्तुगीज लोकांना द्यावे लागेल. ज्यामुळे आपल्याला पेरू खाण्याचे फायदे मिळत आहेत. पेरूच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्याला guava असे म्हणतात

पेरू खाण्याचे फायदे काय ? त्यात पेरू केव्हा खावा ?  हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर, पेरू मध्ये जीवनसत्त्व ‘क’ म्हणजेच C vitamin  असते, पेरू हा दुपारी खास करून खावा, त्यातल्या त्यात जेवण झालेनंतर पेरुवर संधव व मिरेपूड टाकून खावा. ज्याने कफ व वात कारक गोष्टी दूर होतात. व काही दुष्परिणाम होत नाहीत.

चिया सिड्सचे फायदे

निलगिरी तेलाचे फायदे

पेरू पासून कोणते कोणते पदार्थ तयार करता येतात, तर पेरू पासून आपण पेरूची चटणी, पेरुचे रायते, पेरूचा मुरंबा, जाम, भाजी सुद्धा करता येते. पेरूच्या बिया काढून त्यापासून सरबत सुद्धा करता येते ज्यामुळे अंगात ताकद येते व थकवा दूर होतो. आहे की नाही पेरुचे फायदे चमत्कारिक.

मंडळी, ज्यांचे पोट साफ होत नसेन त्यांनी, दररोज पेरुचे सेवन करावे असे चार दिवस सतत करावे, जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होते, पेरू आतड्यांची हालचाली करण्यास मदत करतो.

पेरू खाण्याचे औषधी फायदे मधील महत्वाचा फायदा म्हणजे, ज्यांना दातांच्या समस्या आहेत, ज्यांच्या हिरड्या सुजतात त्यांनी पेरूच्या पानाचा काढा करावा व त्याच्या गुळण्या केल्यास व काही वेळ तोंडामध्ये ठेवल्यास वरील समस्या दुर होण्यास मदत होते.

ज्यांना जुलाबाची समस्या आहे, त्यांनी पेरूच्या पानांचा काढा पिला तर जुलाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत होते. तसेच हा काढा पिल्यास महिलांना होणाऱ्या श्वेतपदर रोगास सुद्धा आराम मिळतो.

ज्या व्यक्तींच्या शरीरात अशक्तपणा जास्त असतो, रोगाचे सोबत लढण्याची शक्ती नसते, त्यांनी पेरु दररोज खाल्ला तर पेरुचे खाण्याचे फायदे काय आहेत, हे त्यांना नक्की समजेल कारण त्यांचे शरीर मजबूत होण्यास व सशक्त होण्यास हा पेरू मदत करतो. खास करून गर्भधारणा केलेली महिला, अशक्त महिला, आजारी व्यक्ती.

पेरूच्या पानांचे पोटीस जर आपण आपल्या शरीरातील ज्या भागावर सूज आलेली आहे, त्याठिकाणी बांधले तर सूज कमी होण्यास व जी ठणक उठत असते तिचा दाह कमी होतो.

गर्भधारणा केलेल्या स्त्रियांचे मध्ये उलटी होणे किंवा वाटणे, नेहमीची मळमळ ह्या तक्रारी नेहमी कानावर येतात. तर स्त्रियांची मळमळ कमी करण्यासाठी पेरूचे सरबत काही अंतराने दिल्यास तोंडातील कडवटपणा निघून जातो. जेवण करण्यास रुची तयार होते.

तर मंडळी कशी वाटली आजचा हा पेरू खाण्याचे फायदे लेख, Peru khanyache fayde marathi. तरी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही ही पेरू फळाचे फायदे, पेरूची माहिती तुम्हाला देत आहोत, तरी आपण सुद्धा आपल्या डॉक्टर व तज्ञांच्या सल्ल्यानुसार पेरूचा उपयोग करावा.

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now