Appe recipe in marathi | आप्पे रेसिपी मराठी
Appe kaise banate hai | appe banane ka tarika | appe recipe madhura | अप्पे बनाने की रेसिपी मराठी | आप्पे रेसिपी मराठी
भरपूर गृहिणींना वाटत अप्पे बनवण्यास खूप वेळ लागतो, खरतर अप्पे बनवायला अर्धा तास लागतो मात्र त्याचे मिश्रण भिजण्यासाठीच एक तास लागतो म्हणून अप्पे करण्यास महिला मंडळ कंटाळा करत, पण अप्पे जर मनसोक्त झाले तर फिर क्या बात है… तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ, कौतूक कोणाला नको असते. तर असो चला सुरुवात करूया अप्पे करायला… आणि सर्वात शेवटची टीप पण नक्की वाचा.
अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य –
1 कप रवा – जाड रवा
दीड कप आंबट ताक
आल्याची पेस्ट
बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर
1 कांदा बारीक चिरलेला
हिरवी मिरची बारीक चिरलेली
कढीपत्ता पाने – बारीक चिरलेली
1 छोटा चमचा जिऱ्याची पूड
चिमूटभर खाण्याचा सोडा
गरजेनुसार गोडेतेल
गरजेनुसार मीठ
मंडळी तर वरील साहित्यामधून आपण साधारण 20 ते 22 अप्पे करू शकतो.
अप्पे करण्याची कृती –
साधारणपणे एक तास जाड रवा व आंबट ताकाचे मिश्रण भिजू द्यावे. तासभर भिजल्यानंतर जाड रव्यामध्ये चिरलेला कांदा, मिरची, जिरे पूड, कोथिंबीर, आले पेस्ट व मीठ घालून ते मिश्रण एकजीव करावे.
आता अप्पे करण्याचे भांडे गॅसवर अथवा चुलीवर गरम होण्यास ठेवावे, तसेच खाण्याचा सोडा टाकून मिश्रण ढवळून घेणे. आता अप्पे करण्याच्या भांड्यात थोडेसे तेल टाकून, आपण तयार केलेले मिश्रण चमच्याने आप्पे करण्याच्या भांड्यात सोडावे.
सर्व ठिकाणी मिश्रण टाकून झाल्यास गॅस बारीक करावा व 5 मिनिटे तरी झाकण ठेवून अप्पे भांड्याची एक बाजू भाजून घ्यावी. त्यानंतर चाकूच्या साह्याने याचप्रमाणे दुसरी भाजून घ्यावी आता तुमचे चटपटीत अप्पे खाण्यासाठी तयार आहेत.
टीप – तर मित्रहो कशी वाटली, अप्पे रेसिपी नक्की सांगा आणि हो तुम्ही तयार केलेल्या अप्पेची चव मात्र कमेंट मध्ये नक्की सांगा बर !
إرسال تعليق