पुरणपोळी कशी बनवायची - puran poli recipe in marathi


पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी रेसिपी, पुरणपोळी टिप्स, puran poli recipe in marathi, puran poli recipe in marathi written, how to make puran poli in marathi ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या लेखात मिळून जातील. तर चला सुरुवात करूया पुरणपोळी करायला.


पुरणपोळी कशी बनवायची - puran poli recipe in marathi
पुरणपोळी कशी बनवायची - puran poli recipe in marathi




महाराष्ट्र, भारत काय पूर्ण जगाला वेड लावणारी म्हणजे आपली मराठमोळी पुरणपोळी, जी 5,6 दिवस आरामशीर टिकते, खाण्यास चविष्ट तसेच चहा सोबत शिळी झाली तर अमृता सारखी गोड लागणारी ही पुरणपोळी तर ही puranpoli कशी बनवतात ते शिकून घेऊया. 


पुरणपोळी रेसिपी - puran poli recipe


पूरण पोळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-

3  वाट्या हरभरा डाळ म्हणजेच चणा डाळ

3 वाट्या चिरलेला गूळ ( किसलेला )

किंवा

1 वाटी साखर 

अर्धे किंवा त्यापेक्षा कमी जायफळ

5 ते 6 वेलदोडे

3 वाटी गव्हाचे कणीक

3 चमचे मैदा,  चिमुटभर  मीठ चवीनुसार,  पाऊन  वाटी  तेल - कणिक मळण्यासाठी

 

पूरण पोळी तयार करण्यासाठी कृती :- how to make puran poli in marathi 


पहिल्यांदा हरभऱ्याची म्हणजेच चणा डाळ धुवून घ्यावी. ही शक्यतो अगोदर निवडून घेणे त्यानंतर धुवावी. 

 
5 किंवा 6 शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यावी.  हरभरा डाळ जर एक कप घेतल्यास तिच्या पाच पटीने पाणी घालावे.  

 
कुकरमधून शिजलेली हरभरा डाळ काढून घ्यावी व त्यातून पाणी काढून घ्यावे ह्या शिजवलेल्या डाळी मधून जे पाणी काढले जाते त्यास पुरणाचा कट अस म्हंटले जाते. हे पाणी काढल्याने तयार होणारी पुरण पोळी हलकी फुलकी होते. डाळी मधून काढलेले पुरणाचे पाणी म्हणजेच पुरणाचा कट याच्यापासूनच आमटी तयार करतात.


हे सुद्धा वाचा - 


ही पुरणाचा कट काढलेली डाळ एका जाड बुड असलेल्या टोपात घालून घोटून घ्यावी व त्यात गूळ घालून ती डाळ शिजवायला ठेवावी.


हे पुरण सुरुवातीला शिजताना पातळ होऊ लागते त्यानंतर घट्ट होऊ लागते. पुराणामध्ये एक चमचा घाला जर तो उभा राहत असेल तर पुरण तयार झाले असे समजावे त्यापेक्षा जास्त शिजवू नये.


पुरण शिजेपर्यंत आपण वेलची, जायफळ व बडीशेफ खलबत्त्यया मधून कुटून घ्या किंवा मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊन बारीक पावडर करू शकता.


पुरण जर थंड झाले असेल तर ते पुरण यंत्रामधून किंवा मिक्सर मधून सुद्धा छोटे करून घेऊ शकता. 


एक तासभर पोळ्या बनवण्याचे पीठ मुरू दिलेनंतर त्या कणिक सैल करावी म्हणजेच मुलायम करून घ्या त्यासाठी त्यास तेलाचा हात लावून टिंबून घ्यावे. 


आता कणकेचे छोटे गोळे तयार करावेत व त्यापेक्षा दुप्पट पुरण त्यामध्ये भरावेत व पोळी लाटायला सुरुवात करावी ही पोळी तांदळाच्या पिठीवर लाटावी.


दोन्ही बाजूने तूप घालून ही पोळी गुलाबी करड्या रंगाची होईपर्यंत भाजावी म्हणजे पोळी छान होतात.

तर कशी वाटली पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी रेसिपी, पुरणपोळी टिप्स, puran poli recipe in marathi, puran poli recipe in marathi written, how to make puran poli बद्दलची पोस्ट धन्यवाद. जय महाराष्ट्र

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने