Jalmitra yojana maharashtra : जलमित्र योजना महाराष्ट्र 2024
आता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आता तीन जलमित्र होणार नियुक्त. याबाबत महाराष्ट्र शासनाने योजनेचा निर्णय घेण्याचे समजले आहे. सर्व माहिती मराठीत पाहू.
अन्नपूर्णा योजना ३ गॅस सिलेंडर मोफत
गावोगावी शाश्वत पाणीपुरवठा योजनेसाठी नियोजन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
त्यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी या तंत्रज्ञांवर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
सर्व ग्रामसेवकांना निर्देश मल्टी स्किलिंग मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढीलप्रमाणे: आहेत. तीन ट्रेडसाठी ग्रामपंचायतीमधील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे, तसेच ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी ३ उमेदवार सहभागी करून एकूण ९ नल जलमित्र गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजना पैसे आले नाहीत
माहिती पंचायत समितीकडे पाठवावी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांचे आयडेंटी साइज फोटो व आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाची आहेत. त्यांची प्री-स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीत कौशल्य संचाकरिता एका ट्रेडसाठी एक उमेदवार याप्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जलजीवन अंतर्गत प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा योजनेच्या पूर्व नियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही. गावपातळीवरील उपलब्ध असलेल्या अप्रशिक्षित अर्धकुशल मनुष्यबळास कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे
टिप्पणी पोस्ट करा