Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी
Ration Card e KYC : रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात...
Ration Card e KYC :
आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्ड बाबत देखील ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात...
लाडकी बहीण योजना पैसे आले नाहीत
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आताई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड (ration Card) धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेशन दुकानात जाऊन..
- रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.
- या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.
- यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
- यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
ई श्रम कार्ड काढा 3000 रुपये मिळवा
मेरा राशन या अँपच्या मदतीने....
- सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अँप डाऊनलोड करा
- त्यानंतर अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.
- आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.
- त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.
- ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल.
- ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
टिप्पणी पोस्ट करा