neet exam information in marathi | नीट परीक्षेची माहिती मराठीत
प्रथमतः जय महाराष्ट्र आपण neet चा अभ्यास करताय याबद्दल आपले खूप खूप आभार. तर चला सुरुवात करूया NEET नीट समजून घ्यायला.
चला NEET परीक्षा नेमकं आहे तरी काय हे जाणून घेवूया -
NEET EXAM म्हणजे तुमच्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी आहे. कारण आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअरकरायचे असेल तर आपल्याला NEET ची exam ही द्यावी लागते.
NEET EXAM MARATHI |
नीट ची तयारी कशी करावी - PREPARATION FOR NEET EXAM
चालू दोन वर्षांत NEET च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडासा बदल झालेला दिसतो. परंतु नुकत्याच झालेल्या NEET च्या questions paper नुसार रचना कशी असते हे समजून घेऊ.
neet full form in marathi
NEET परीक्षेच्या पेपर चे स्वरूप आणि रचना
- परीक्षेचे माध्यम – ऑफलाईन/पेपर पेन स्वरूप
- परीक्षा वेळ – 3 तास : 20 मिनिटे.
- एकूण विषय –
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- वनस्पती शास्त्र
- प्राणीशास्त्र
- प्रश्न स्वरूप – MCQ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
- एकूण प्रश्नसंख्या – 200 प्रश्न (त्यापैकी 180 प्रश्न सोडवणे)
- एकूण गुण – 720
- निगेटिव्ह मार्किंग – आहे
- योग्य/बरोबर उत्तरासाठी : +4
- अयोग्य/चुकीच्या उत्तरासाठी : -1
- जास्तीचा प्रश्न सोडविल्यास/कोणताही पर्याय न निवडल्यास : 0
- एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास : -1
- भाषा माध्यम – एकूण 13 भाषा (मराठी उपलब्ध)
- १३ भाषा
- मराठी,इंग्रजी ,हिंदी,तेलगू,गुजराती,मल्याळम,बंगाली,उडिया,तमिळ,आसामी,पंजाबी इत्यादी.
neet exam information in marathi language
आपल्याला NEET question paper सोडवण्यासाठी एकूण ३ तास आणि २० मिनिटे एवढा वेळ असतो.
प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने विचारले जातात. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न २०० प्रश्न 200 questions विचारले जातातत्यापैकी १८० प्रश्न सोडवणे.
प्रश्नपत्रिका एकूण ७२० गुणांची असते ज्या मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते.
UPSC INFORMATION IN MARATHI
NEET च्या निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले जातात.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जातो.
- प्रश्नाच्या पर्यायांमधील एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास १ गुण वजा केला जातो.
- जर परीक्षार्थीने जास्त प्रश्न सोडवले असतील तर कोणताही गुण दिला जात नाही किंवा वजा केला जात नाही.
आपण पाहिले कि,NEET च्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र & प्राणिशास्त्र) हे तीन विषयअसतात.पण पेपरमध्ये या प्रत्येक विषयाचे दोन उपविभाग देखील असतात ज्यांना पेपरमध्ये Sections म्हणून दर्शविलेलं असतं.
प्रत्येक विषयाचे दोन उपविभाग असतात Section A आणि Section B.
Section A मध्ये 35 प्रश्न विचारलेले असतात आणि Section B मध्ये 15 प्रश्न विचारलेले असतात. Section B मधील 15 प्रश्नांपैकी 10 प्रश्न सोडवायचे असतात.हीच माहिती आपण तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ जेणेकरून समजणे सोपे जाईल.
टिप्पणी पोस्ट करा