लाडकी बहीण योजना पैसे आले नाहीत मंग करा हे काम | ladaki bahin yojana paise ale nahit
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हा निधी जमाच झाला नाही. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही आहे.
त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही आहे, त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana third installment women does not recieve 4500 amount installment now what do to read full story)
लाडकी बहीण योजना पैसे न येण्याचे पहिले कारण -
खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप 4500 जमा झाले नाहीत. त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा. बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का? हे देखील तपासून घ्या. जर बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरात लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल. तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत.
लाडकी बहीण योजना पैसे न येण्याचे दुसरे कारण -
दुसरी आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाऊंट नंबर भरले आहे. त्यामुळे जॉईंट अकाऊंट धारकांना देखील पैसे येणार नाहीयेत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे म्हणजेच फक्त एका महिलेच्या नावे खाते उघडून ते अर्जात भरून घ्या. तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे हे अकाऊंट देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.
दरम्यान सरकार 29 सप्टेंबरपर्यंत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार असल्याचे सांगितले जी आजची तारीख आहे. सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 25 सप्टेंबरपासून पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. जर 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर, महिलांना मोठा धक्का बसणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही? ‘येथे’ करा तक्रार
माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. यासाठी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. यासोबतच महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवू शकतात. पण सध्या हे ऍप हैंग होत असलेबाबत भगिनी सांगत आहेत. तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही चौकशी करता येईल. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल.
NPS वात्सल्य योजना
'लाडकी बहीण योजनेकरिता इतक्या' महिला ठरल्या लाभार्थी
''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
शेत जमीन कशी मोजावी
إرسال تعليق