आताच डाउनलोड करा

कबड्डी खेळाची माहिती मराठी - kabaddi information in marathi

कबड्डी कबड्डी हा शब्द आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत, त्यात बरेच मंडळी कबड्डी खेळ खेळले सुध्दा असतील. मंडळी कबड्डी खेळाडूची नावे व माहिती मध्ये प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, नितीन तोमर ही नावे तुमच्या कानावर नेहमी पडत असतील तसेच यांचा कबड्डी खेळ तुम्ही पाहिला सुध्दा असेल. 

तसेच कबड्डी खेळाचे कौशल्य माहिती असणारे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कबड्डी खेळाडूची नावे मध्ये काशिलिंग अडके ,सचिन शिंगाडे, निलेश शिंदे, विशाल माने, विराज लांडगे आणि श्रीकांत जाधव यांची माहिती तर सर्व देशाला झाली आहे. कबड्डी खेळाचे फायदे मराठी मुलांनी माहिती करून घेऊन आपले नाव उंचावले पाहिजे. तर मंडळी कबड्डी खेळाची माहिती मराठी PDF मध्ये न वाचता लेखी स्वरूपात वाचली तर नक्कीच फायदा होईल. Kabaddi information in marathi 

तसेच आपल्या देशाने सुध्दा कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्याने आपले कबड्डी खेळणारे खेळाडू सुध्दा कबड्डी खेळाचा इतिहास न शोडता महाराष्ट्र कबड्डी नियम शोधत आहेत व जीव तोडून मेहनत करीत आहेत. तर चला जाणून घेऊया कबड्डी खेळाची माहिती मराठी मध्ये व सुरुवातीला पाहूया कबड्डी खेळाचा इतिहास.

कबड्डी खेळाचा इतिहास मराठी - History Of Kabaddi in marathi


चला आता कबड्डी खेळाचा इतिहास माहिती करून घेऊया ! तर कबड्डी कबड्डी हा शब्द कै ह्या तमिळ भाषेतील पिढी पासून आला. कै याचा अर्थ हात पकडणे किंवा हाताला धरून राहणे.  तसेच हू तू तू म्हणजे काय कोणता खेळ हे सर्वांना माहिती आहे. हू तू तू म्हणजे सुध्दा कबड्डी कारण पूर्ण भारतात कबड्डी ऐवजी हु तू तू बोलले जाते. जसे की बांगलादेशमध्ये कबड्डी खेळ हद्दू म्हणून ओळखला जातो तर तामिळनाडूमध्ये चादुकट्टू व पंजाब मध्ये कुड्डी नावाने कबड्डी खेळ ओळखला जातो. कबड्डी खेळाची प्रस्तावना भारत देशा बरोबरच आता जग भरात झाली आहे.

कबड्डी खेळाची माहिती मराठी - kabaddi information in marathi

Kabaddi khelachi mahiti marathi


कबड्डी खेळाची सुरुवात सर्वप्रथम तामिळनाडूमध्ये झाली होती याचाचा अर्थ असा की, कबड्डी खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला तर आपल्या भारत देशात झाला. आपल्या भारत देशाने कबड्डीचा शोध लावला याचा आपल्या पण कुठे याची माहिती आपण घेऊया.  तर कबड्डी हा खेळ केव्हा सुरू झाला तर सन 1938 मध्ये कोलत्याला खेळलेल्या गेलेल्या राष्ट्रीय खेळात कबड्डी खेळाचा समावेश करण्यात आला त्यामुळे कबड्डी हा खेळ केव्हा सुरू झाला याला हेच समर्पक उत्तर म्हणावे लागेल. त्यानंतर म्हणजे सन 1950 साली अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन ची स्थापना करण्यात आली व त्यामध्ये कबड्डी खेळाचे नियम ठरविण्यात आले व सन 1972 मध्ये अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली व 1972 मध्येच पहिली वहिली टूर्नामेंट चेन्नई मध्ये भरविण्यात आली होती.

1979 मध्ये कबड्डीचा पहिला आंतररा्ट्रीय सामना भारत व बांगलादेश यांच्या मध्ये खेळला गेला. त्यानंतर 1980 मध्ये कबड्डी खेळाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला गेला विशेष म्हणजे भारत संघाने बांगलादेशला धूळ चारून स्पर्धा जिंकली होती.

कबड्डी खेळाचे मैदान - kabaddi Ground mahiti

सांघिक खेळाची माहिती म्हंटल तर कबड्डी खेळाचा उल्लेख तसेच खो खो, क्रिकेट खेळाचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो.  सर्वप्रथम ज्या ठिकाणी कबड्डीचे मैदान तयार केले जाणार आहे, त्या ठिकाणच्या त्या जागेचे निरीक्षण करून हे तपासले जाते की कबड्डी खेळली जाणारी जागा मऊ आहे की नाही. त्यानंतर मऊ व कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाही अशी जागा कबड्डी खेळायला निवडली जाते. विशेष बाब म्हणजे कबड्डी खेळाकरिता महिला व पुरुष यांचे करिता कबड्डी ग्राउंड रचना वेगवेगळी असते.

कबड्डी मैदानाची आकृती

कबड्डी मैदानाची आकृती


कबड्डी ग्राउंड  हे दोन भागामध्ये विभागलेले असते मधोमध जी रेषा असते तिला, मध्य रेषा किंवा सेंट्रल लाईन म्हंटले जाते. आता आपण कबड्डी खेळा करीता कबड्डी ग्राउंड माप किती असते याची माहिती घेऊया.

कबड्डी ग्राउंड माप पुरुषांसाठी 50 मीटर बाय 10 मीटर तर महिलांसाठी 11 मीटर बाय 8 मीटर असे कबड्डी खेळाचा मैदानाचे माप असते हे कबड्डी मैदानाची आकृती ही आयताकृती असते. या प्रकारे कबड्डी खेळाचे मैदान - kabaddi Ground mahiti आहे.

कबड्डी खेळाचे मैदान - kabaddi Ground mahiti आहे.

कबड्डी खेळाचे मैदान - kabaddi Ground mahiti आहे.

कबड्डी या खेळाची लोकप्रियता जास्त असल्यामुळे हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळला जातो. कबड्डी मध्ये किती खेळाडू असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी या खेळात किती खेळाडू असतात तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळताना प्रत्येक संघामध्ये 7 खेळाडू असतात आणि त्यासोबतच तीन खेळाडू अतिरिक्त म्हणून दिलेले असतात.  या स्पर्धेत पुरुषासाठींचे कबड्डी ग्राउंड माप जवळपास 13 बाय 10 तर स्त्रियांसाठी हा कबड्डी ग्राउंड माप 12 बाय 10 हे असते. हा खेळ 20-20 मिनिटांच्या दोन भागात खेळला जातो व त्यामध्ये पाच मिनिटांचा एक ब्रेक दिला जातो. जस cricket खेळताना मध्ये एक संघ खेळून गेला की मध्ये ब्रेक मिळतो त्याच प्रमाणे.

कबड्डी खेळाचे साहित्य - कबड्डी किट (kabaddi kit)

कबड्डी खेळ खेळताना प्रेक्षकांना तसेच संघातील खेळाडूंना विरोधी संघाची ओळख व्हावी व स्वतःची ओळख व्हावी याकरिता प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट, शॉट्स आणि शूज दिले जातात टी-शर्टवर मागच्या बाजूला खेळाडूचे नाव किंवा संघाचे नाव व क्रमांक लिहिलेले असतात. तसेच कबड्डी खेळ खेळताना दुखापत झाल्यास फर्स्टएड बॉक्स सुद्धा दिला उपलब्ध असतो.

कबड्डी खेळाचे सर्वसाधारण नियम - Kabaddi Rules marathi

मित्रहो महाराष्ट्र कबड्डी नियम व जागतिक पातळीवर असणारे कबड्डीचे सर्वसाधरण नियम वेगळे असू शकतात किंवा नाही याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

कबड्डी खेळाची माहिती मराठी मध्ये घेत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कबड्डी खेळाचे नियम ( rules of Kabaddi in marathi ) तर महाराष्ट्र कबड्डी नियम म्हणजे आक्रमक करणाऱ्या संघातील खेळाडूचा मुख्य उद्देश विरोधी संघातील खेळाडूला आक्रमण करून तेथील खेळाडूंना बाद करून परत आपल्या संघात सुरक्षित परत येणे हा असतो.  याउलट जर विरोधी पक्षाला आक्रमण केलेल्या संघातील खेळाडूला काही 30 सेकंद पकडुन धरावे लागते. कबड्डी खेळाचे कौशल्य माहिती असणारा खेळाडू नक्कीच उच्च स्तरावर कबड्डी स्पर्धा खेळतो व जिंकतो.

कबड्डी खेळा मधील पॉईंट्स गुण - how calculate points in Kabaddi game in marathi

बोनस पॉइंट : पुढील संघात जर सहा किंवा सहापेक्षा अधिक खेळाडू उपस्थित असेल आणि त्या वेळी जर रेडरने बोनस लाईन ला क्रॉस करून परत आला तर त्याला म्हणजेच त्याच्या संघाला एक बोनस पॉईंट प्राप्त होतो.

टच पॉईंट : रेड मारणारा खेळाडू जर विरोधी संघात जाऊन तेथील खेळाडूंना स्पर्श करून यशस्वीपणे परत त्यांच्या संघामध्ये येत असेल त्यावेळेस रेडर ला टच पॉईंट दिला जातो या पॉइंटची संख्या त्याने किती खेळाडूंना स्पर्श केले यावर अवलंबून असते.
कलम 188 म्हणजे काय माहिती आहे का ?
ऑल आउट पॉईंट : जर एखाद्या संघाने विरोधी संघातील सगळ्या खेळाडूंना बाद करून मैदानाबाहेर काढले तर त्यावेळेस जिंकणाऱ्या संघाला बोनस म्हणून दोन गुण अतिरिक्त दिले जातात.

टैकल  पॉईंट ; यामध्ये जर विरोधी संघातील खेळाडू रेड मारणाऱ्या रेडरला 30 सेकंदापर्यंत त्यांच्या संघामध्ये थांबवून ठेवू शकले तर त्यांना एक पॉईंट दिला जातो.

एमटी रेड : जेव्हा रेड करणारा रेडर बोनस लाईनला पार करून विरोध संघातील कोणत्याही डिपेंडर ला स्पर्श न करता परत त्याच्या संघामध्ये येतो त्या रेडला एमटी रेड असे म्हणतात यामध्ये दोन्ही पैकी कोणत्या संघाला पॉइंट दिले जात नाही.

सुपर रेड : ज्या रेड मध्ये रेडर तीन व तीन पेक्षा अधिक पॉईंट घेऊन येतो त्याला सुपरहिट असे म्हणतात.

डू ऑर डाय रेड : जेव्हा एखाद्या टीमकडून दोन वेळेस एमटी रेड केली जाते तेव्हा त्यांच्या तिसऱ्या रेड ला डू ऑर डाय रेड म्हणतात या रेड मधील रेडला विरोधी संघाकडून त्याचा पॉईंट किंवा बोनस पॉईंट घेऊन येणे गरजेचे असतात नाहीतर विरोधी संघाला एक पॉइंट दिला जातो.
कवट्या म्हाकाल नेमला होता तरी कोण ?
सुपर टैकल : जेव्हा विरोधी संघामधील खेळाडूंची संख्या तीन व तीन पेक्षा कमी असेल आणि त्या संघातील डिफेंडर रेडरला आउट करण्यामध्ये सक्षम होतात त्यावेळेस सुपर टेकर म्हणून त्यांना एक अतिरिक्त पॉईंट दिला जातो पण विरोधी संघ या पॉइंट चा उपयोग बाद झालेल्या खेळाडूंना पुनर्जिवित करण्यासाठी करू शकत नाही.

विश्व स्तरावर कबड्डीचे नियम -

कबड्डी माहिती घेत असताना आपल्याला महाराष्ट्र कबड्डी नियम सोबत जागतिक कबड्डी नियम पहावे लागतील याचा अभ्यास करायला हवा. कारण विश्व स्तरावर कबड्डी खेळाचे नियम थोडे वेगळे असतात. इथे एखाद्या संघाच्या टीमने विरोधी संघाच्या टीमला 7 गुणा पेक्षा अधिक पॉईंटने हरविले तर सामना जिंकणाऱ्या संघाला 5 गुण दिले जातात.

एखाद्या वेळेस मॅच बरोबरी म्हणजेच टाय झाल्यावर दोन्ही संघाच्या टीम ला 3-3 गुण विभागून दिले जातात. त्यानंतर त्या दोन्ही टीम मधून कोणती टीम सेमीफायनलमध्ये जाईल याचा निर्णय डीफ्फेरेन्शियल स्कोर द्वारा केली जाते.  ज्या संघाचा डीफ्फेरेन्शियल स्कोर जास्त तो संघ सेमी फायनल मध्ये जातो.

जर एखाद्या वेळेस दोन्ही टीमचे डीफ्फेरेन्शियल स्कोर बरोबर आले तर अशा वेळेस दोन्ही टीमचे एकूण पॉईंट तपासले जातात व ज्या टीमचे जास्त पॉईंट्स असतील ती टीम सेमीफायनलमध्ये जाते.

कबड्डी मध्ये गोल्डन रेड याचा अर्थ असा की, जो संघ टॉस जिंकतो त्या संघाला गोल्डन रेड मारण्याचा मान दिला जातो. दोन्ही संघाला एक संधी असते जर टॉस मध्ये सुध्दा बरोबरी झाली तर दोन्ही टीम मधून विजेता टॉस द्वारे नियुक्त केले जातात.

कबड्डी चे प्रकार - types of Kabaddi game in marathi

आपल्या भारत देशात कबड्डीचे चार प्रकार पडतात.
संजीवन कबड्डी : म्हणजे यामध्ये बाद झालेला खेळाडू पुढील संघातील एक खेळाडू बाद झाल्यास पुन्हा जिवंत होतो.
पोलीस भरती कागदपत्र 
जमिनी स्टाईल : यामध्ये पुढील संघ पूर्णपूने बाद होत नाही तोपर्यंत सामना सुरू असतो.

काही महत्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे -

1) कबड्डीच्या एका टीम मध्ये एकूण किती खेळाडू असतात ?
उत्तर - कबड्डी च्या एका संघात एकूण 12 खेळाडू असतात आणि त्यामधील 7 खेळाडू हे विरोधी संघाबरोबर खेळत असतात.

2) कबड्डी या खेळामध्ये एका वेळेस किती संघ खेळू शकतात ?
उत्तर - कबड्डी मध्ये एका वेळेस 2 संघ एकामेकाविरुद्ध खेळू शकतात. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now