आताच डाउनलोड करा

navratri colours 2024 list marathi | नवरात्रीचे नऊ रंग 2024

अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथी पासून ह्या वर्षीच्या 2024 च्या नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्र हा एक हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. तर आता ह्या नवरात्रीत नव रंगांना विशेष महत्व असते. तर कोणत्या दिवशी कोणता रंग आणि त्याचे महत्व घ्या जाणून...

नवरात्रीचे नऊ रंग व त्यांचे महत्व 2024 | colours of Navratri 2024

दिवस पहिला - पांढरा रंग - Day one - white colour 

मंडळी पांढरा रंग हा शांतीच, शुद्धतेच प्रतीक असून या रंगाने आपला आत्मविश्वास वाढतो तसेच ह्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते त्यात हा सफेद रंग शेलपुत्री देवीचा आवडता रंग असल्याने पहिल्या दिवसाचा मान ह्या पांढरा रंग मिळवतो.

दिवस दुसरा - लाल रंग - Day 2 - red colour

नवरात्रीतील दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा असतो ह्या दिवशी देवीची पूजा केली जाते. हा लाल रंग शुभ असून साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक म्हणून मानला जातो.


navratri colours 2022 list marathi | नवरात्रीचे नऊ रंग 2022

नवरात्रीचे रंग 2024

दिवस तिसरा - नारंगी रंग - Day 3 - Orange colour 

आजच्या दिवशी चन्द्रघंटा देवीची पूजा केली जाते त्यात नारंगी रंग ह्या देवीला आवडतो म्हणून आजचा दिवस नारंगी रंग वस्त्र वापरले जाते. हा रंग शुभ असून सकारात्मक उर्जेचे प्रतिक आहे.

दिवस चौथा - पिवळा रंग - Day 4 - Yellow

आजच्या दिवशी कुष्मांडी देवी पुजली जाते. हा रंग देवीचा आवडता रंग असून तो सौभाग्याचे, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते.

आप्पे रेसिपी मराठी मध्ये

फुगडी खेळाची माहिती

दिवस पाचवा  - हिरवा रंग - Day 5 - green colour

आजचा दिवस स्कंदमातेसाठी पूजला जातो. हा रंग देवीचा आवडता असून निसर्गाचे प्रतिक आहे.

दिवस सहावा - राखाडी रंग - Day 6 - grey colour
 

आजचा दिवस कात्यायनी देवीचा म्हणून पूजला जातो. आजच्या दिवशी देवीला राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. हा रंग बुद्धिमत्तेचे प्रतिक मानला जातो.

दिवस सातवा - निळा रंग  - Day 7 - blue colour

ह्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा विश्वाचे प्रतीक असून देवीचा आवडता रंग आहे.

दिवस आठवा - जांभळा रंग - Day 8 - Purple/Violet colour

ह्या दिवशी महागौरी देवीला पुजले जाते. आजचा दिवशी जांभळा रंग वापर केला जातो कारण हा देवीचा आवडता रंग असून हा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचे प्रतिक मानला जातो.

दिवस नववा - गुलाबी रंग - Day 9 -  Pink colour 

आजच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि स्त्री शक्तीचे प्रतिक मानले जाते.


तर हे होते navratri colours 2024 marathi | नवरात्रीचे नऊ रंग 2024 व त्यांचे महत्व 

धन्यवाद 🙏 

Tags - navratri che rang 2024 | नवरात्र कलर 2024 | 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now