आताच डाउनलोड करा

rti form in marathi | माहितीचा अधिकार मराठी मध्ये फॉर्म 


नमस्कार या ठिकाणी rti form in marathi तसेच rti form in marathi pdf  व  rti information in marathi ही सर्व माहिती देण्यात येत आहे, यामध्ये माहितीचा अधिकार कसा वापरावा याबद्दल पण माहिती देत आहोत. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य आहे हे लक्षात घ्यावे.माहितीचा अधिकार अर्ज ग्रामपंचायत खाली देत आहोत.


1. मी कोणत्या सार्वजनिक प्राधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करु शकतो?  माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ खाली अर्जदार कोणतीही माहिती मिळवू इच्छितो, याकरिता या पोर्टलद्वारे फक्त महाराष्ट्र शासनाचा विभाग आणि सार्वजनिक प्राधिकारी यांच्याकडे अर्ज करु शकतो. प्रथम टप्प्यामध्ये, ही सुविधा फक्त मंत्रालयीन विभाग आणि सार्वजनिक प्राधिकार यांनाच उपलब्ध आहे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी नाही. rti full form in marathi is RIGHT TO INFORMATION.


RTI FORM IN MARATHI

RTI FORM IN MARATHI



2. माहितीचा अधिकार, २००५ खाली माहिती मिळविण्यासाठी मला अर्ज कसा लिहिता येईल? अर्जाचा मजकूर विहित प्रपत्राच्या स्तंभामध्ये लिहावा. सद्यस्थितीत अर्जाचा मजकूर विहित प्रपत्राच्या स्तंभामध्ये १५० शब्दांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. जर का अर्जाचा मजकूर १५० अक्षरांपेक्षा जास्त असेल तर प्रपत्राच्या स्तंभामध्ये तो पीडीएफ संलग्न "आधारभूत दस्तऐवज" म्हणून अपलोड करण्यात येईल.

rti information in marathi | माहितीचा अधिकार

3. माहितीच्या अधिकाराकरिता फीचे प्रदान मला कसे करता येईल?


माहितीचा अधिकार नियम २०१२ खाली दारिद्र्य रेषेखालील अर्जदाराला कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. तथापि, या अर्जासोबत माहितीचा अधिकार नियम, २०१२ अन्वये अर्जदाराने समुचित शासनाने यासंदर्भात निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राची प्रत अर्जदाराने सोबत जोडणे आवश्यक आहे.


दारिद्र्य रेषेखालील नसलेल्या अर्जदारासंदर्भात प्रथम पृष्ठ भरल्यानंतर त्यांना पेमेंट गेटवे पृष्ठकडे जाण्यासनिर्देशित केले जाईल. यावर अर्जदार विहित RTI फी अदा करण्यासाठी "रक्कम अदा करा" या


बटनावर क्लिक करील.


अर्जदार विहित RTI फी खालील प्रकारे अदा करु शकेल.


(१) इंटरनेट बँकींग


(२) एटीएम-नि-डेबीट कार्ड


(३) क्रेडिटकार्ड


4. माहितीच्या अधिकाराखाली ऑनलाईन अर्जाकरिता मला पावती मिळेल का?


अर्ज सादर केल्यानंतर, एक असाधारण नोंदणी क्रमांक निर्गमित करण्यात येईल. तो अर्जदाराला भविष्यातील संदर्भासाठी संदर्भीत करता येईल. हा असाधारण क्रमांक अर्जदाराला एसएमएस तसेच ई मेल द्वारे पाठविण्यात येईल.


हे लक्षात ठेवा, ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टलद्वारे भरण्यात आलेला अर्ज, संबंधीत विभागाच्या


आणि सार्वजनिक प्राधिकाऱ्याच्या सादरकर्त्या अधिकाऱ्याकडे न जाता, संबंधीत विभागाच्या आणि सार्वजनिक प्राधिकाऱ्याच्या नोडल अधिकारीकडे इलेक्ट्रॉनिकली प्राप्त होईल. नोडल अधिकारी, सदर RTI अर्ज इलेक्ट्रॉनिकली किंवा प्रत्यक्षात संबंधीत जन माहिती अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करेल.


5. विहित प्रपत्रामध्ये मी अयोग्य विभाग किंवा सार्वजनिक प्राधिकारी निवड केल्यास माझ्या अर्जाचे काय होईल?


जर का योग्य विभाग आणि सार्वजनिक प्राधिकारी यांच्याकरिता माहितीच्या अधिकाराखालील अर्ज केला नसेल तर माहिती अधिकार अधिनियम २००५च्या कलम ६ (३) अन्वये संबंधीत विभाग आणि सार्वजनिक प्राधिकारी यांचानोडल अधिकारी सदर अर्ज महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभाग आणि प्राधिकारी यांच्या नोडल अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिकली हस्तांतरीत करेल.


6. अतिरिक्त फी (काही असल्यास) द्यावी लागणार असेल तर अतिरिक्त फीबाबत मला कळविण्यात येईल का ?


जर का, माहिती पुरविण्यासाठी अतिरिक्त फीचा खर्च देणे आवश्यक असेल तर, नोडल अधिकारी तसे कळविल, अर्जदार ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टलच्या पर्यायामधील सद्यस्थिती पहा" यामध्ये हे पाहू शकेल आणि तशा ई-मेल सूचनाअर्जदाराला दिल्या जातील. ऑनलाईनअतिरिक्त फी भरण्यासाठी ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टलच्या "सद्यस्थिती पहा" या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे आणि नोंदणी क्रमांक सादर केल्यानंतर "भरणा करा" पर्याय उपलब्ध केला जाईल.


चिया सिड्स चे हे फायदे माहिती आहेत का ? 


7. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे मला अपील कसे करता येईल?


प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे अपील करण्यासाठी अर्जदाराने माहितीचा अधिकार ऑनलाईन पोर्टलचा "प्रथम अपील सादर करा" हा पर्याय निवडावा आणि जे प्रपत्र दिसेल ते भरावे. संदर्भासाठी अर्जाचा मूळ नोंदणी क्रमांक वापरता येईल.


rti application form in marathi


माहितीचा अधिकार ऑनलाईन पोर्टलमधून अशाप्रकारे दाखल केलेले अपील, प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याकडे न जाता संबंधित विभाग आणि प्राधिकाऱ्याच्या नोडल अधिकारीकडे इलेक्ट्रॉनिकली प्राप्त होईल. • नोडल अधिकारी प्रथम अपील संबंधित प्रथम अपीलीय प्राधिकारी यांच्याकडे इलेक्ट्रानिकली किंवा प्रत्यक्ष


हस्तांरित करील.


8. अपील दाखल करण्यासाठी मला फी अदा करणे आवश्यक आहे काय ? माहिती अधिकार नियम अन्वये प्रथम अपीलाकरिता रु.२०/- ची फी अदा करणे आवश्यक आहे.


9. माहितीचा अधिकार ऑनलाईन पोर्टलकडून मला एसएमएस मिळेल का? एसएमएस मिळण्याकरिता अर्जदाराने / अपीलार्थीने मोबाईल क्रमांक द्यावा.


10. पोर्टलबाबतच्या विचारणेबाबत किंवा सूचना सादर करण्याबाबत मी कोणाशी संपर्क साधावा? या पोर्टलच्या विचारणेबाबत कृपया ०२२-४०२९३००० येथे कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) संपर्क साधावा किंवा


rti.support@maharashtra.gov.in वर ई-मेल करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now