वजन कमी करण्याचे घरगुती सोपे उपाय | Weight Loss Tips In Marathi
तर मंडळी अनेक ठिकाणी तुम्ही वजन कमी करण्यासाठी हे करा ते करू नका असे वाचले असेल परंतू मी तुम्हाला वजन कमी करण्याचे घरगुती साधे व सोप्पे उपाय सांगतो. तर त्यासाठी तुम्ही पुढील health tips follow करा कारण health is wealth.
जेवण करताना अन्नाचे प्रमाण –
मित्र मंडळी जेवण करताना मोजकेच जेवण करा म्हणजे पौष्टीक आहार घ्या जेणेकरून जास्त अन्न खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू लागते. त्यामुळे जास्त खाण्यावर भर देण्यापेक्षा कमी खा पण पौष्टीक खा. जेणेकरून तुमचे वजन कमी तर होईलच सोबत पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय करण्याची गरज नाही तुम्ही दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त देखील राहू शकाल.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा ?
अन्न पचत आहे ना ?
म्हणजेच एक घास 32 वेळा चावून खावा अस आपले पूर्वज सांगत, तर माझ्या सांगण्याचा उद्देश की, अन्न सहजपणे चघळा व चावून खा ज्याने आपले पचन चांगले होते. व आपले पाचन तंत्र सुधारण्यास देखील मदत करते.
पुरेशी झोप व कमी ताणतणाव
संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे की, पुरेशी झोप नसेल तर तर तुमच्या शरीरात चरबी वाढण्यास मदत होते त्यामुळे तुमचे वजन वाढते. त्यामुळे जास्त तणावात न राहता दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या
बसण्याची पद्धत –
वाचून वेगळे वाटेल पण होय तुमच्या आसनाचे मुळे सुद्धा अनेक रोगांना निमंत्रण दिले जाते, कारण तुमच्या पोटातील स्नायूंसाठी व तुमच्या पोटातील आतड्यांसाठी आसनांची चांगली मुद्रा उपयुक्त आहे. तसेच पाठीच्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे.
मुबलक प्रमाणात पाणी पिणे –
सकाळी उठल्यावर कमीत कमी एक ग्लास पाणी प्यावे जेणेकरून तुम्ही हायड्रेटेड राहता आणि शरीरात मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. तसेच तुमची भूक शांत राहते आणि पोट बराच काळ भरलेले राहते.
प्रयोग म्हणून तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने हर्बल टी किंवा लिंबूपाणी पिऊ शकता किंवा ग्रीन टी सुद्धा योग्य प्रमाणात घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा