आताच डाउनलोड करा

mahila bachat gat in pune information in marathi – महिला बचतगट माहिती

 

आज आपण महिला बचत गट योजना पुणे येथील ओम साई महिला बचत गट यांच्या बद्दल ऍग्रोवन मध्ये आलेल्या लेखाबद्दल माहिती घेणार आहोत. कारण महिला सुद्धा कुठे मागे नाहीत ते त्यांनी दाखवून दिले.

 

mahila bachat gat in pune information in marathi - बचतगट माहिती
mahila bachat gat information in marathi – बचतगट माहिती

तर मंडळी पुण्यातील ओम साई महिला बचत गटातील यांनी लोणच्याचे केवळ उत्पादन करून विक्री न करता त्याचा एक ब्रँड तयार केला आहे. व त्या स्वतः कष्ट करून स्वतः आत्मनिर्भर बनून हा ब्रँड वाढवून त्याच्या नावाने विक्री करून अनेक घर चालवीत आहेत.

 

तर जाणून घेऊया हा महिला बचत गट कसा तयार झाला ?

 

तर 2007 या वर्षी पुणे सहकारी बँकच्या मुख्य अधिकारी सौ. बेल्हेकर व जगताप यांच्या सल्ल्याने हा बचतगट तयार होत गेला. पुणे जिल्ह्यात आज पर्यंत साधारण 26 हजार महिला बचतगट आहेत. सुरुवातीला ह्या महिला बचत गटाच्या सदस्यांनी 18000/- रुपये बचत करून भाजणी च्या चकल्या तयार करून विकल्या त्यांनतर त्यांच्यां कडे अनेक प्रकारच्या मागण्या वाढल्या व व्यवसायात वाढ होत गेली.

महिला बचत गटातील तयार होणारी उत्पादने

कैरी, कारले, मिरची, ओली हळद, लिंबाचे गोड लोणचे तसेच इतर लोणचे, लिंबू- मिरची एकत्रित लोणचे, खजूर लाडू, शेंगदाणे चटणी, खोबरे- लसूण चटणी.

बांधकाम कामगार नोंदणी

बचत गटाचा आर्थिक आराखडा

*दहा व अधिक प्रकारची विविध उत्पादने
*सध्या 50 ग्रॅम, 100 ग्रॅम , 200 ग्रॅम, 500 ग्रॅम मध्ये उपलब्ध
*सरासरी दररोजरची विक्री सुमारे 2 ते 3 हजार रुपये
*दर महीन्याला सरासरी 60 हजार रुपये
*दर महिन्याला साधारण 25 ते 30 टक्के नफा धरून विक्री करतात. त्यातून महिना साधरण 20 हजार रुपये मिळकत.

महिला बचतगट नोंदणी योजना अर्ज फॉर्म डाउनलोड करा

download

 

ओम साई महीला बचत गटामार्फत महिलांना प्रशिक्षण

ओम साई बचत गटामार्फत शेतकरी, महिला बचत गट यांना प्रशिक्षण दिलेले आहे. सध्या हा बचतगट हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला बचत गटांना एक महिन्याचे प्रशिक्षण अल्प शुल्क घेऊन देण्याचा विचार करत आहे.

– शोभा चक्रनारायण,
अध्यक्ष,
ओम साई महिला बचत गट, पुणे
मो – 9370496799

 

अधिक माहिती करिता
माहिती संदर्भ : ऍग्रोवन

 

बचतगट बद्दल पूर्ण माहिती करिता क्लीक करा.

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now