आताच डाउनलोड करा

Funny birthday wishes in marathi - फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !

Funny birthday wishes in marathi | crazy birthday wishes in marathifunny birthday wishes in marathi for friend | comedy birthday wishes in marathi for friend | tapori funny birthday wishes in marathi for friend 

Funny birthday wishes in marathi - फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !

Funny marathi birthday wishes 



आपल्या (गावातील/सोसायटी मधील/मंडळातील) निसर्गप्रेमी झाड, पान, फुल याचे जाणकार उत्तम ट्रेकर्स एका दमात कोणताही किल्ला चढाई करणारे, क्रिकेट खेळाबरोबर वाद-विवादात प्राविण्य मिळवणारे,

मासे, खेकडे सुलभतेने पकडणारे, मोहाचे पोळे हाताने बाजूला करून मध मिळवणारे जिगरबाज व्यक्ती,

विषारी-बिनविषारी साप यांच्या बाबत केव्हाही फोन येताच हातातील काम टाकून ब्रॅड पिट यांचे सोबत ड्रीम युगावर बसून ambulance पेक्षा तात्काळ हजर होऊन साप पकडून जँगलात सोडून लोंकाचे प्राण वाचवून पंचक्रोशित आशीर्वाद मिळवणारे,

नोकरी करून घरातील शेती कामाला मोठा हातभार लावणारे चिखलगाव discovery वरील bear grylls म्हणून ख्याती मिळवणारे आमचे मित्र यांना जन्मदिवसाच्या शिरवळ- भोर भरून शुभेच्छा.

म्हणकाळेश्वर आपणास उदंड आयुष्य व आरोग्य देवो 😍😎😘

crazy birthday wishes in marathi

आमचे लाडके छोटे बंधू 😍 😘

उजव्या हाताने जलदगतीने गोलंदाजी करणारे व डावखुरे फलंदाज🏏, अंडर आर्म specialist,

IPL, BIG BASH, T&T league तसेच कसोटी, एकदिवसीय, t20 ची चेंडूगणीस ⚾माहिती असलेले क्रिकेट चाहते 🏆...

बांगलादेश सोबत खेळताना दिनेश कार्तिक (DK) ऐवजी शंकर ला फलंदाजी करिता पाठविल्याने तीव्र गावठी I Z शब्दात नाराजी, हळहळ व्यक्त करणारे क्रिकेट शौकीन...

चिडल्याशिवाय खेळ पूर्ण होत नाही असे ठाम मत असलेले आक्रमक विराट कोहली समर्थक व तशीच केस रचना हि ठेवणारे,

भाऊशी वाकड त्याची मावलाईवर लाकड,

भाऊला नडणार तो नरकात सडणार अश्या खुन्नशी स्वभावाचे दिलेली खुन्नस कधीही न विसरणारे

भरमसाठ Dj गाणी 🎧 ऐकण्याची हौस असलेले,

ONly गुरू रंधावासाठी एक फोल्डर राखून ठेवणारे

मित्राच्या दुनियादारीत मनसोक्त रमणारे,

आमचे लहान भाऊ/मित्र/काका यांना जन्मदिवसाच्या गावठाण बंद शुभेच्छा 💐!


funny birthday wishes in marathi for friend 

हे आहेत आमचे बंधू सेल्फी काढण्याची भरपूर हौस असून एक सुद्धा सेल्फी धड काढणारे, 

परळ भागात मोटरसायकलला वेगाने चालवणारे पण गावाकडे आलेकी महाड आंबेघर फाट्यावरील "वेग कमी जीवनाची हमी" बोर्डला मोटारसायकलचे वेग कमी असून देखील ठोकणारे, 

20 तारीख आवडते म्हणून घरच्यांसोबत भांडून करील 20 तारखेलाच करील नायतर लग्नच करत नाय म्हणणारे, 


महालक्ष्मी रेसकोर्सवर खुन्नस वर भल्या-भल्याना पाठीमागे टाकणारे व पोरींना smile देऊन पळणारे,

आता वाटत नसले तरी एकेकाळी मुंबई मॅरेथॉन शर्यत गाजवणारे, आमचे जिगरबाज मित्र/काका/दादा यांना जन्मदिवसाच्या राहते घर, आजोळ व सासुरवाडी भरून शुभेच्छा 💐 😍😘😘😘😘 


comedy birthday wishes in marathi for friend |  

ह्या राजाच राजपण आजपण अन उद्या पण, दूध डेअरी वर थांबून देखील दुधाचा उपवास करणारे, जाईल तिकडे मित्र जोडणारे, शरीरापेक्षा शब्दात ताकद ठेवणारे व कोणी नडला तर त्याचे बोलून बोलून कान फोडणारे, खळी यांच्या गालावर आठवण आली तर भेट माळावर असे ब्रीदवाक्य प्रत्येक पोरीला बोलणारे, मित्रांना जीवापाड जपणाऱ्या ह्या राजा माणसाला जन्मदिवसाच्या कासुर्डीची जत्रा भरून शुभेच्छा💐😍😍😘😘😘 



Happy Birthday wishes in marathi 

अस्सल सोलापुरी व्यक्तिमत्त्व, करमाळा जेऊरचे रहिवाशी, सखल हिंदुस्थानात मोबाईल चोरी तपासला प्राधान्य देता यावे, यासाठी नागराज मंजुळे यांची सैराटमधील परश्याच्या जागी आलेली ऑफर बड्या दिलाने धुडकावून,  आर्चिला नाराज करणारे व आपल्या कामास बोडके साहेबांबरोबर प्राधान्य देणारे झिंग झिंग झिंगांट अदाकार, जरी पडला पाऊस तरी यांना लय फिरण्याची हौस असलेले मुंबई फिरस्ते, यांच्या नजरेत खांब दिसताच त्यावर लटकून तिरंगा करणारे लवचिक शरीरयष्टीचे मल्लखांबाचे वस्ताद, बांगडीवाल्या भाभीच्या सल्ल्याचे जवळचे मित्र, स्वतःचे लग्न बाजूला ठेऊन मित्रांच्या लग्नात आवर्जून हजेरी लावणारे, अचानक ट्रेकर्सचे sound, मंडप डेकोरेटर काका/दादा/मामा यांना जन्मदिवसाच्या फटका पॉईंट भरून शुभेच्छा ✌


Funny birthday wishes in marathi for best friend


जय हनुमान मित्र मंडळाचे कट्टर कार्यकर्ते, हनुमंतावर केलेल्या प्रेमापोटी मंदिरातच झोपायला जाणारे भक्त, मंदिरातून रात्री अपरात्री उठून कुठे, कसे केव्हाही गायब होणारे अद्भुत रहस्यमय रसायन, 

गावातील घरा घरातील गोष्टी माहिती असणारे शेरलॉक होम्स, खेकडे, मटण, मच्छि, चिकनचे कर्दनकाळ, इंद्रायणी भाताचे ठोक व घाऊक व्यापारी, 

घरात नाही घोटा तरी बापूचा खायचा लय बेकार हाय कोठा, आंबवडे खोऱ्यातील जत्रा कधीही न चुकवनारे, पूणे-सातारा जिल्ह्यातील गल्लीन गल्ली माहिती असणारे तसेच ह्या दोन्ही जिल्ह्यातील किल्ले फिरलेले दररोज वारी करणारे bike rider, 

मिल्खा नाईक यांच्यावर जिवा वरून प्रेम करणारे, घरात प्रत्येक brand ची कपडे असणारे, निवडणुकीत सर्व पक्षाचे प्रचार करून मतदान nota ला करणारे, जिमला न जाता इंद्रायणी भातावर जिमसारखी बॉडी बनवणारे बिल्डर, पडत असला जरी मुसळधार पाऊस आमच्या बापूला फोटोची लय हौस.

गावातील कोणत्याही व्यक्तीच्या कामात तत्परतेने मदत करणारे, मित्रांच्या हाकेला कायमस्वरूपी उभे राहणारे, तसेच नको त्या व्यक्तीला वेळेवत टांग देऊन बरोबर कोलणारे, आमचे अगदी जवळचे मित्र समीर बापू कोंढाळकर यांना जन्मदिवसाच्या इंद्रायणी भात व मटणाचा रस्सा खाऊन शुभेच्छा !

बापू खूप खूप मोठा हो तुला प्रकटदिवसाच्या shine गाडीत महाग असल तरी पेट्रोल टाकी एकदम फुल करून करून शुभेच्छा रे 😍😘 love you 🎂✌ 


crazy birthday wishes in marathi for friend

जय हनुमान मित्र मंडळाचे प्रामाणिक परंतू हनुमान जयंती पुरते उपलब्ध असे व्यस्त कार्यकर्ते, भाईशी वाकड त्याची मसनात लाकड, 

गावातील नामांकित व्यक्तीमहत्व, मोदी पंतप्रधान होण्यामागे ज्यांचे मोलाचे योगदान होते असे वादग्रस्त गृहस्थ, अंगात लाखो किडे असनारे, जे करतात नको तिथे वळवळ असे हे मोरे घराण्याचे शेंडेफळ, 

भावाशी नडणार तो नरकातच सडणार, समीर बापू, गणा अप्पा यांना वेळोवेळी नको ते मार्गदर्शन करणारे आणि जर नाही एकले तर पुण्यातील कुख्यात लोकांची ओळख सांगून कॉल सेन्टर सोबत फोन वर अर्धा तास बोलणारे, 

गावच्या जत्रेतील नारळाच्या कुस्तीचा मान मिळवणारे दणकट पैलवान, पुणे भाजीपाला मार्केट मध्ये सगळ्या गाळ्यात जाऊन हवा करणारे, पोरींच्या मागे लागून त्यांचे भाऊ बनणारे, सर्व राजकीय पक्षांचे चिकन मटण संपेपर्यंत कट्टर समर्थन करणारे व निवडणूक यादीत नाव नसणारे......

गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभाग घेणारे, माणूस म्हणून खूप भारी असलेले, कोणाला नको असली तरी मदत करणारे, गावच्या जत्रेत खादीशिवाय पोशाख न करणारे, म्हणकाळेश्वर मंदिराजवळ एक सामना खेळून वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेटचा संन्यास घेतलेले खेळाडू असलेले रॉयल कारभार ग्रुप, 

अफगाणिस्तान चे अध्यक्ष मनाने दिलदार असे पै. सॅम दादा मोरे यांना जन्मदिवसाच्या खेकडाची गोणटी भरून शुभेच्छा ! बाळा प्रगती करत रहा खंडोबाचा आशीर्वाद तुझ्यावर नेहमी राहो 😊🎂😍😘🎉 

शुभे चुक- सॅम दादा युवा मंच हँगकाँग




Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now