kalam 188 information in marathi | कलम 188 माहिती मराठी
सध्या संपूर्ण जगात तसेच आलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना ने धुमाकूळ घातला आहे त्यानिमित्ताने राज्य सरकारने ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा जी कलम 188, कलम 144 ही कलमे लागू केली आहेत त्याची माहिती kalam 188 information in marathi ( कलम 188 ) माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत.
Kalam 188 in marathi |
1897 साथीचे रोग प्रतिबंधक ( Epidemic Diseases Act, 1897) अन्वये जेव्हा ठरावीक ठिकाणी, जिल्ह्यात, राज्यात अथवा देशात कोणत्याही सरकारी व्यक्तीने जे नियम लागू केलेले असता, त्या ठिकाणी साथीचे रोग प्रतिबंधक नियमांचे आदेश तुडकवनाऱ्या व्यक्तींवर ipc kalam 188 ( भारतीय दंड संहिता कलम 188 ) नुसार गुन्हा दाखल केला जातो.
1897 साथीचे रोग प्रतिबंधक कायदा मोडणाऱ्या व्यक्तीने त्याठिकाणी जीवित अथवा वित्तीय हानी केली नाही तरी ipc kalam 188 ( भारतीय दंड संहिता कलम 188 ) नुसार गुन्हा दाखल केला जातो.
ipc kalam 188 ( भारतीय दंड संहिता कलम 188 ) नुसार शिक्षा
1) एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
2) मनुष्य जीवन अथवा त्यांच्या आरोग्यास काही धक्का निर्माण झाल्यास सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
3 ) हा जामीनपात्र गुन्हा आहे.
kalam 188 information in marathi - कलम 188 काय आहे ते जाणून घेऊया -
लोक सेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा; एखादा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार
प्रदान झालेल्या लोक सेवकाने जारी केलेल्या अशा आदेशाद्वारे, विवक्षित कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा अथवा स्वत:च्या
कब्जातील किंवा स्वत:च्या व्यवस्थापनाखालील विवक्षित मालमत्तेबाबत विवक्षित बंदोबस्त करण्याचा आपणांस निदेश मिळाला आहे.
हे माहीत असून जो कोणी अशा निदेशाची अवज्ञा करील त्याला -
जर कायदेशीरपणे नियुक्त झालेल्या एखाद्या व्यक्तीला अशा अवज्ञेमुळे अटकाव, त्रास किंवा क्षती झाली अथवा
अटकाव, त्रास किंवा क्षती यांचा धोका उत्पन्न झाला अथवा ते होण्याकडे त्या अवज्ञेचा रोख असेल तर, एक महिन्यांपर्यंत असू
शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा
होतील.
आणि जर अशा अवज्ञेमुळे मानवी जिवित, आरोग्य किंवा सुरक्षितता यांना धोका पोचला किंवा पोचण्याकडे तिचा रोख
असेल अथवा तीमुळे दंगा किंवा दंगल घडून आली किंवा घडून येण्याकडे तिचा रोख असेल तर, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल
इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची,
किंवा
दोन्ही शिक्षा होतील.
kalam 188 marathi - स्पष्टीकरण
अपाय घडवून आणणे अपराध्याला उद्देशित असले पाहीजे किंवा आपण अवज्ञा केल्याने अपाय घडणे संभवनीय
आहे याची त्याला पूर्वकल्पना असली पाहीजे अशी आवश्यकता नाही. तो ज्याची अवज्ञा करतो त्या आदेशाची त्याला माहिती होती,
आणि त्याच्या अवज्ञेमुळे अपाय घडला किंवा घडणे संभवनीय आहे, एवढे पुरेसे आहे.
kalam 188 उदाहरण -
एका विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये असा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार प्रदान
झालेल्या लोक सेवकाने असा आदेश जारी केला आहे. 'क' जाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतो, आणि त्यामुळे दंग्याचा धोका उत्पन्न होतो. 'क' ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
हे माहिती आहे काय ?
संचारबंदी कलम कोणते, कर्फ्यू लागला म्हणजे नक्की काय त्यासाठी यावर क्लीक करा.
पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी यातील नेमका फरक काय
إرسال تعليق