पोलीस भरती कागदपत्रे 2024 | police bharti required documents 2024
Police bharati documents |
पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024 Document List in Marathi
खाली देण्यात आलेले कागदपत्रे प्रत्येकाला लागतीलच असे नाही, कागदपत्रे ही उमेदवाराच्या शिक्षण पात्रतेनुसार व त्याचे कॅटेगिरी नुसार लागतात. तुमचं जेवढे शिक्षण झालेलं असेल त्याच शिक्षण पात्रतेचे कागदपत्रे तुम्हाला लागतील. तसेच तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक होमगार्ड असाल तरच हे कागदपत्रे लागतील. या पातळीवर तुम्ही बसत नसाल तर त्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता नाही.
- 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- 10 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
- ITI/डिप्लोमा मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला
- शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
- जातीचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
- विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
- होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
- माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
- माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यावर लागेल)
How to join indian army
उमेदवारांसाठी काही सूचना
- वरील पैकी कोणतेही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर लवकर काढून घ्या
- सर कागदपत्रांवर नाव सारखे हवे, जर एखाद्या डॉक्युमेंट मध्ये नावात बदल असेल तर आताच नाव Update करून घ्या
- जर तुमचे कोणतेही documents हरवले किंवा खराब झाले तर नवीन काढून घ्या.
- वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला लागतीलच असे नाही काही कागदपत्रे तुमच्या पात्रतेनुसार लागतील.
पोलीस भरती कागदपत्रे 2024 करीता वरील गोष्टींची आवश्यकता आहे.
إرسال تعليق