kavtya mahakal cast
कवट्या महाकाल नेमका होता तरी कोण
धडाकेबाज चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच आपले इन्सपेक्टर - महेश कोठारे यांनी अखेर ह्या रहस्यावर प्रकाश टाकला. त्यांनी ट्विटरवर ट्वीट करत सांगितले कि, चित्रपटाच्या सुरवातीला कवट्या महाकाळची भूमिका बिपीन वर्टी ह्या कलाकाराला देण्यात आलेली होती.
तसे बिपीनजी वर्टी हे एक गुणी अभिनेते तर आहेतच परंतू त्याच सोबत ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील आहेत. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘चंगु मंगू’ आणि ‘डॉक्टर डॉक्टर’ ह्यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
धडाकेबाज चित्रपटाचे सुरवातीला कवट्या महाकाळची भूमिका ही बिपीन वर्टी यांनी केली, पण त्यांच्या बीझी शेड्युलमुळे त्यांना पुढे काम करता न आल्याने तब्बल आठ (8) कलाकारांनी हि भूमिका साकारली. त्यामुळेच कवट्या महाकाळचा खरा चेहरा त्यांना दाखवता आला नाही असे त्यांनी सांगतीले.
खुद्द महेश कोठारे यांना सुध्दा त्या ८ कलाकाराची नावे आठवत नाहीत. पण हि भूमिका साकारणारा सुरवातीचा कलाकार आणि त्याचा आवाज हा बिपीन वर्टी यांचाच आहे असे त्यांनी सांगितले.
إرسال تعليق