difference between police custody and judicial custody
पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यांमध्ये काय फरक असतो |
पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यांमध्ये काय फरक असतो
पोलीस कस्टडी किंवा पोलीस कोठडी ( police custody ) म्हणजे ज्या वेळेस कोणत्याही संशियत आरोपीतास कोर्टात हजर केले असता, तपास अधिकारी ( I.O ) कोर्टाकडे आरोपीचा ताबा तपास कामाकरिता मागतो म्हणजेच गुन्हयांसी त्याचा संबध आहे अगर कसे, त्यांना गुन्हा केला तर कसा केला त्याचेसोबत कोण होते,
याची माहिती घेणेसाठी तो जास्तीत जास्त 15 दिवस पोलीस कोठडी ( police custody ) मागू शकतो, तेव्हा कोर्ट तपासाची कागदपत्रे पाहून, आरोपीचे वकील, सरकारी वकील, तपास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून,
कोर्ट शेवटी पोलीस त्यांच्या अभ्यासानुसार पोलीस कोठडी किंवा न्यायालाईन कोठडी देतात, पोलीस कोठडी दिली तर आरोपीचा ताबा पोलिसाकडे असतो त्यात पोलीस तपास करतात.
आणि कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली तर, तो पोलीसाच्या ताब्यातून न्यायालयाच्या ताब्यात जातो, न्यायालय वाटले तर जामीन देऊ शकतो, किंवा जेल मधेच ठेवतो, म्हतवाचे म्हणजे न्यायालयीन कोठडीत पोलीस तपास करू शकत नाही.
टिप्पणी पोस्ट करा