parambir Singh biography in marathi


परमबीर सिंग मराठी - parambir Singh biography in marathi
parambir Singh biography in marathi

(Who is parambir sing in marathi )

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 February फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना नवीन पोलिस आयुक्त म्हणून नेमले होते.


श्री. परम बीर सिंग हे भारतीय आयपीएस अधिकारी असून ते मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.  त्यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलिस आयुक्त व मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
1990 मध्ये प्रथमच गुन्हे शाखा मुंबईचे पोलिस उपायुक्त म्हणून 
त्यांनी नाव कमविले होते, त्यावेळी त्यांनी अंडरवर्ल्ड गुन्हेगारी रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा जन्म चंदीगडमधील पंजाबी परिवारात झाला होता.


त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पंजाबच्या अमृतसर येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले.  त्यानंतर पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातुन समाजशास्त्र विषयात MA पूर्ण केले.
1988 मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि महाराष्ट्र पोलिसात आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाले.  त्यांनी आपल्या 32 वर्षांच्या सेवाकाळात वेगवेगळ्या पदांवर काम केले आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारी रोखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.


बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या चौकशीवर जेव्हा चौकशी केली गेली. आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणाले की, तपास योग्य मार्गावर असून मुंबई पोलिस या प्रकरणातील प्रत्येक बाबींचा शोध घेत आहेत आणि त्यांनी या प्रकरणात सामील असलेल्या सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.


परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेनंतर राज्याच्या गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात झाली.  तेव्हा त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.


अधिक माहिती साठी वाचा सविस्तर


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने